तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात


वृत्तसंस्था / पुणे :   आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात  पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी शिर्डीकडे निघण्याच्या तयारीत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   
तृप्ती देसाईंनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्या भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती.
आम्ही शिर्डीला निघणार होतो. त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या.  
सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत. पण त्यानंतरही मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न होतं आहे. अयप्पाच्या भक्तांकडून काही महिलांना मारहाण करण्यात आली आहे. त्या संदर्भात तृप्ती देसाईंना पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची होती.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-19


Related Photos