महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दाखविली हिरवी झेंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा गडचिरोली यांच्या भव्य पेंशन दिंडीला जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी अशोक रापेलीवार, महाराष्ट्र जुनी पेशन हक्क संघटना शाखा अहेरी चे अध्यक्ष सतिश खाटेवर, उपाध्यक्ष नारायण नागरे, सचिव रमेश रामटेके, सहसचिव नारायण सिडाम, प्रदिप रामगिरीवार, नितेश कुळमेथे, रघुपती मूरमाडे, संजय राठोड, भगवान मडावी, राजना बिटीवार, प्रविण टोंगे, अवधुत धनजे, रहिम पठाण, परवेज पठाण, विजय डोईफोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ ची निवृत्ती वेतन योजना लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त मयत कर्मचाऱ्यांच्या परिवाराला केद्र व राज्याच्या धर्तीवर जूनी पेशन योजना लागू करावी अशा अनेक मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे पेन्शन दिंडी रवाना करण्यात आली.
News - Gadchiroli | Posted : 2018-10-02