User 'vnxmanish7720098' has exceeded the 'max_user_connections' resource (current value: 30)Access denied for user 'ye6mtmaooozq'@'localhost' (using password: NO) Vidarbha News Express , Latest News , vnxpres

  झाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी


- मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री ना.बडोले यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील झाडे, झाड्या कुणबी, झाडे कापू, झाडे कापेवार या समाजातील लोकांना भटक्या जमातीचे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आ.डाॅ. देवराव होळी यांनी सामाजिक न्याय मंत्री न. राजकुमार बडोले यांच्याशी बैठकीत चर्चा केली. या बैठकीत झाडे समाजाविषयी अभ्यासगट निर्माण करून मागासवर्गीय आयोगाकडे या संदर्भात शिफारस करण्याचे आदेश ना. बडोले यांनी दिले आहेत. यामुळे लवकरच या समाजाचे प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास आमदार डाॅ. देवराव होळी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बैठकीला झाडे समाजाचे वासुदेव तुंकलवार, पुरूषोत्तम अर्कपटलवार, बंडु चौधरी सह भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील झाड्या कुणबी, झाडे कापु, झाडे कापेवार या समाजाला एन टी सी चे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात बैठक आयोजित करावी याबाबत आ.डाॅ. होळी यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावरून आज १६ आॅक्टोबर रोजी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्र्यांच्या दालनलात बैठक पार पडली. बैठकीमध्ये झाडे समाजाच्या समस्यांवर लक्ष वेधण्यात आले. त्यानुसार ना. बडोले यांनी तत्काळ अभ्यास गटाची निर्मिती केली व लवकरच मागासवर्गीय आयोगाकडे या समाजाला एन टी सी चे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शिफारस करण्यात येईल याबाबत आश्वस्त केले. या निर्णयामुळे लवकरच झाडे समाजाच्या समस्या निकाली निघणार आहेत, असा विश्वास आ.डाॅ. होळी यांनी व्यक्त केला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-16


Related Photos