महत्वाच्या बातम्या

 युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर मर्यादा : घरगुती वापरासाठीच उपलब्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जागतिक युद्धामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होत असल्याने केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांसाठी एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी घातली आहे. आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठी उपलब्ध होईल, आणि पुरवठा फक्त सरकारी कंपन्यांमार्फत केला जाईल, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिला आहे.

घरगुती सिलिंडरचा तुटवडा -
व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांमध्ये गॅसची कमतरता जाणवत आहे. तसेच घरगुती ग्राहकांनाही सिलिंडर वेळेवर मिळत नाही, असे गॅस एजन्सींनी सांगितले आहे. अनेक ग्राहकांना पुढील महिनाभर सिलिंडर मिळणार नाही, अशी माहिती मिळत आहे. यामुळे गॅसच्या काळाबाजाराची भीती वाढली आहे.

केंद्र सरकारने का घेतला निर्णय? -
तेल कंपन्यांतील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत बहुतेक एलपीजी आयातीवर अवलंबून आहे. देशात काही प्रमाणात उत्पादन होत असले तरी ते अपुरे आहे. युद्धामुळे आयातीवर अडथळे येत असल्याने व्यावसायिक वापरासाठी एलपीजीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगितले गेले.

हॉटेल आणि उद्योग बंद पडण्याची भीती -
सीएनजीच्या बाबतीत परिस्थिती तुलनेने स्थिर आहे कारण देशांतर्गत उत्पादन पुरेसे आहे. जिथे सीएनजी उपलब्ध आहे, तिथे उद्योगांनी एलपीजीऐवजी सीएनजीचा वापर सुरू केला आहे. मात्र देशातील अनेक भागात सीएनजी नेटवर्क नसल्यामुळे त्या भागातील हॉटेल आणि उद्योग लवकरच बंद पडण्याची भीती आहे. बुलॉक कार्ट रेस्टॉरंटचे बलबीर सिंग वाधवा म्हणाले, या अडचणींमुळे आम्हाला मोठा फटका बसणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos