उन्हाळ्याच्या कालावधीत शाळा सकाळ पाळीतच घ्याव्यात


- विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षक संघाची भूमिका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विदर्भात वाढत चाललेल्या उष्णतेची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा १२ मार्च २०२६ पासून सकाळ पाळीत भरविण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली यांनी केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर तसेच गडचिरोली तालुका सरचिटणीस संजय मडावी यांनी शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी कालावधीत शाळा सकाळ पाळीत घेण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी शिक्षणाधिकारी पवार यांनी या मागणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकाबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




