महत्वाच्या बातम्या

 आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडुन आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा-झिंगानूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक, माजी पंचायत समिती सभापती दासू मडावी हे लकवाग्रस्त झाले. ही माहिती अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांना कळवतच वेळेचा विलंब न करता, लकवाग्रस्त दासू मडावी यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत पाठविले.

राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार व राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांनी झिंगानूर गाठून दासू मडावीच्या भेट घेऊन आरोग्य विषयी विचारपूस करून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पाठवलेली आर्थिक मदत मडावी यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, राष्ट्रवादी सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, माजी सरपंच बोडका गावडे, कैलास आत्राम, महेश दुर्गमसह झिंगानूर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos