महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मार्चला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवार दोन मार्च रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोकशाही दिनाकरीता नागरिकांकडून २ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तक्रार/ निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

तक्रार अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी होणे आवश्यक आहे. लोकशाही दिनात सादर करावयाचे तक्रार अर्ज, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एक महिन्यात कारवाई न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.

नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामार्फत महापालिका आयुक्त व सभापती यांचे अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे लोकशाही दिनाचे आयोजन त्यांचे कार्यालयात होत असल्यामुळे संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात न दाखल करता संबंधित कार्यालयात आयोजित होत असलेल्या लोकशाही दिनात सादर करावा.

लोकशाही दिनात न स्वीकारण्यात येणारे अर्ज -
राजस्व, अपील प्रकरणे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेले प्रकरणे, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनासाठी स्वीकृत करण्यात येणार नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos