युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही


- केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात मत 

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गेले वर्ष कोरानामुळे विस्कळीत झाल्याने त्या वर्षी युपीएससी परीक्षेचा शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आता केंद्र सरकारने अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी मिळणार नाही असे न्यायालयाला सांगितले आहे.
केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युपीएससीची पूर्व परीक्षा झाली होती.
गेल्या वर्षी युपीएससीचा आपला शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी वाढवून द्यावी अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारने यावर विचार करावा असे निर्देश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश विचाराधीन असल्याचे मत जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने न्यायालयाला कळवले होते. आता यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपले मत मांडले असून अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार दिला आहे.

 
  Print


News - World | Posted : 2021-01-22


Related Photos