सिरोंचा पं स चे संवर्ग विकास अधिकारी साहेबराव खिराडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  सिरोंचा :
पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी साहेबराव किसनराव खिराडे (५५) यांचे   आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खिराडे  याना हृदयविकाराच्या   झटका आल्यानंतर  उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राकेशकुमार जाधव, तहसिलदार रमेश जसवंत , पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील, आनंद टेकाम आणि सर्व ग्रामसेवक यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. साहेबराव  खिराडे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांच्या  मागे पत्नी व एक मुलगा व मुलगी आहे. या घटनेचा तपास सिरोंचा पोलीस करीत आहेत. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-18


Related Photos