महत्वाच्या बातम्या

 अवैध लाकूड तस्करी उघडकीस : आलापल्लीतील वनविभागाची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आलापल्ली (घोट वनपरिक्षेत्र) : वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून १८ लाख ५७ हजार ६०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीवरून वनविभागाने निकतवाडा-अंबेला रस्त्यावर नाकाबंदी केली. संशयास्पद आयसर वाहन आल्यावर त्यातील १५ ते २० इसम उड्या मारून पसार झाले, मात्र चार आरोपींना पकडण्यात यश मिळाले.

जप्त केलेला मुद्देमाल -
आयसर वाहनात तांदळाच्या गोण्याखाली २१ नग सागवान लाकूड लपवून ठेवले होते, ज्याची किंमत ५ लाख २७ हजार ६०८ रुपये आहे. याशिवाय, ५५ गोण्या तांदूळ, २ ताडपत्री, ४ मोबाईल आणि एक विनाक्रमणीय मोटारसायकल जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत १८ लाख ४७ हजार ६०८ रुपये आहे.

आरोपी आणि तपास -
चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यात शुभम मशिद, कुणाल मुर्यवंशी, अल्ताफ खान, आणि रामनारायण भांगरे यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध चोरीसाठी देखील तपास सुरू आहे. पसार झालेल्या इतर आरोपींचा शोध सुरु आहे. वनविभागाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघडकीस आली असून, फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल.





  Print






News - Gadchiroli




Related Photos