गडचिरोली जिल्हा परिषदेतील वरिष्ठ लिपीक अडकला एसीबीच्या जाळयात : ३ हजारांची स्विकारली लाच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
ग्रज्युटीच्या रकमेचे धनादेश तयार करून देण्याकरिता जिल्हा परिषद कार्यालयातील शिक्षण विभागातील लिपीकास  ३  हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. राजु महादेव देसाइ (५१) असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे. सदर कारवाईमुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार हे सेवनिवृत्त शिक्षक असुन त्यांना मिळणाऱ्या ग्रॅज्युटीच्या रकमेचे धनादेश तयार करून देण्याकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद गडचिरोली येथील लिपीक राजु महादेव देसाई यांना भेटले असता तक्रारदारास ३  हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्राद दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक यशवंत राऊत यांनी तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आज २०  जानेवारी २०२१  रोजी वरिष्ठ लिपीक राजु महादेव देसाई यांनी तक्रादरार यांना ग्रॅज्युटीच्या रकमेचा धनादेश तयार करून देण्याकरिता 3 हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहाथ पकडले. आरोपी लिपीक राजु महादेव देसाई यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये पोलिस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार, अपर पोलिस अधिक्षक मिलींद तोतरे, गडचिरोलीचे ला.प्र.विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, पोहवा प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, नापोशि सतिश कत्तीवार, नापोशि सुधाकर दंडीकेवार, नापोशि देवेंद्र लोनबले, पोशि किशोर ठाकुर, चानापोशि तुळशिराम नवघरे, चानापोशि घनश्याम वडेट्टीवार यांनी केलीे आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-01-20


Related Photos