महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा नगरपंचायत स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिरोंचा : नगरपंचायत स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकहाती सत्ता प्रस्थापित करत आपला दबदबा कायम राखला.

डॉ. धर्मराव बाबा आत्राम (आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री) यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि नगरपंचायतचे यशस्वी उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या प्रभावी रणनीतीमुळे पक्षाने दणदणीत विजय संपादन केला.

या निवडणुकित -
स्वच्छता समिती उपाध्यक्ष : बबलू पाशा
बांधकाम सभापती : बक्कु पोचम आकुदारी
पाणीपुरवठा सभापती : पद्मा भगवान पिल्ली
महिला व बालकल्याण समिती सभापती : मलेश्वरी संजीव पेदापल्ली
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पमालांनी स्वागत करून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. 

या विजयामागे नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी मागील काही दिवसापासून आखलेली चाणक्य पद्धतीची रणनीती निर्णायक ठरल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

हा विजय आदरणीय आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादामुळेच शक्य झाल्याची भावना उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी व्येक केले.  तसेच नगराध्यक्षा फर्जाना शेख यांनी सत्ताधारी सदस्यांमध्ये एकजूट राखत युतीच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावल्या आणि विजय नंतर सर्वांचे अभिनंदन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos