विवाहित मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची जावयाने केली हत्या


विदर्भ न्युज एक्स्प्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूर येथे घडली आहे. पित्याने विवाहित मुलीवर बलात्कार केल्याने संतापलेल्या जावयाने सासऱ्याची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मृत व्यक्ती पिपळा गावाची असून पिडीतेच वडील होते. ते मुळचे लखनऊ येथील हसिमपूर गावचे होते. मुलगी अल्पवयीन असल्यापासून नराधम पिता तिच्यावर अत्याचार करत होता. पण लग्नानंतरही हे अत्याचार थांबले नाहीत. नराधम पिता लग्नानंतरही तिच्यावर अत्याचार करत होता. लग्नानंतर वरचेवर तो तिच्या सासरी येत होता पण सुनेचे वडील असल्याने सासु-सासऱ्यांना त्याच्यावर कधी संशय आला नाही. नराधम पिता महिनाभर तिच्याघरी राहत होता. पण सततच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने आपल्या नवऱ्याला पित्याचे कृत्य सांगितले. प्रचंड संतापलेल्या जावयाने सासऱ्याला घरातून हकलून दिलं. पण नराधम पिता त्यावर न थांबता तो पुन्हा सोमवारी पीडितेच्या घरी गेला आणि त्याने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेच्या दिराने पाहिले आणि त्याच्या भावाला घडलेला प्रसंग सांगितला. पीडितेचा नवरा आणि त्याच्या नातेवाईकाने मिळून त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. त्या रात्री दोघेही सासऱ्याच्या घरी गेले आणि सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केली. सोमवारी सकाळी नातेवाईक त्यांना भेटायला घरी गेले असता हत्या झाल्याचे समोर आले. त्यांनी घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
News - World | Posted : 2021-01-19