महत्वाच्या बातम्या

 नवरगांव येथील निवेदिता महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी निवडणुकीत महिला प्रगती पॅनलचा विजय


- महिला प्रगती पॅनल गटाच्या सर्व १२ उमेदवारांचा विजय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : नवरगांव निवेदिता महिला क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नवरगांव येथे प्रथमच झालेल्या निवडणुकीत महिला प्रगती पॅनल या गटाने संपूर्ण १२ जागांवर विजय संपादित केलेले आहे. महिला प्रगती पॅनल व महिला विकास परिवर्तन पॅनल अशा दोन गटांमध्ये संस्थेची निवडणूक गुरुवार ५ जानेवारीला झाले. सायंकाळीच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये महिला विकास पॅनलचे उमेदवार सुनंदा सुरेश बाकरे, सुरेखा प्रकाश खोब्रागडे, पूजा किशोर कोरेवार, तारा अरविंद राऊत, अनुराधा विनोद बोरकर, रत्ना विजय प्यारमवार, अंजली राकेश बल्लेवार, वैशाली संजय बोडणे, नंदा राजकुमार गभणे, वर्षा दिनकर गायकवाड, प्रज्ञा दिपक कवासे, मंजुषा चंद्रशेखर बिरेवार या सर्वांचा विजय झाला. निकाल घोषित होताच नागरिकांनी फटाके फोडून व गुलाल लावून आनंद साजरा केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos