महत्वाच्या बातम्या

 घाटंजी येथे महाराष्ट्र राज्य विज कंपनीकडून वीज बिल वापरा व वेळेत विज बिल भरण्याचे आवाहन


विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने घाटंजी शहरात १३ फेब्रुवारी रोजी विविध ग्राहकाभिमुख योजनांच्या जनजागृतीसाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली. आयोजित लॉग मार्चद्वारे स्मार्ट मीटर, वीजबिल वेळेत भरण्याचे महत्त्व, वीज चोरी रोखणे तसेच वीज अपघात टाळण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

ही पदयात्रा घाटंजीतील शिवाजी चौक येथील महावितरण कार्यालयापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत विविध योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. वीज चोरी रोखा - सुरक्षित वीज वापरा तसेच स्मार्ट मीटर म्हणजे अचूक बिलिंग अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महावितरणकडून ९ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर पंधरवडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत स्मार्ट मीटरचे फायदे, अचूक रीडिंग प्रणाली व पारदर्शक बिलिंग प्रक्रियेबाबत ग्राहकांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 

घाटंजी येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उप विभागीय अभियंता विक्रम उराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता गौरव कनाके, अभियंता प्रशांत नाईक, अनुराग नैताम, गोपाल पोतदार सह संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे वीज ग्राहकांमध्ये जागरूकता वाढून वेळेवर बिल भरणे, सुरक्षित वीज वापर आणि स्मार्ट मीटरबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.





  Print






News - World




Related Photos