महत्वाच्या बातम्या

 पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्जांचे नुतनीकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय वसतीगृहात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत योजनेच्या अर्जांचे नुतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत सन २०२५-२०२७ मध्ये वर्धा प्रकल्पातंर्गत महाविद्यालयातील पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या नुतणीकरणास पात्र असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत नुतणीकरणाचा ऑनलाईन अर्ज भरलेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी पर्यंत नुतणीकरणाचे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरीता निवास, भोजन, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येते. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी अर्जाचे नुतणीकरण करुन घ्यावे. विहित मुदतीत नुतणीकरण न केल्या त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos