महत्वाच्या बातम्या

 स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश जारी केले आहेत.

या अनुषंगाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विविध आरोग्य साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जनजागृती अभियानांतर्गत पंधरवड्यात शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग प्रतिज्ञाचे वाचन, नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, कुष्ठरोगावरील म्हणी, घोषवाक्य आदी स्पर्धांचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच कुष्ठरोग दोड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.

यासोबतच या अनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विजय डोईफोडे यांनी दिली.

कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याकरीता कुष्ठरोग अधिसुचित आजार घोषीत झाला असुन कुष्ठरोग बाधीत व्यक्तींना शोधून काढून उपचाराखाली आणण्यासाठी आता खाजगी दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालय यांचा सामावेश राहाणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व व्यक्तीने पुढाकार घेवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

२६ जानेवारी रोजी ग्रामसभेत कुष्ठरोग प्रतिज्ञा -
२६  जानेवारी २०२६ रोजी ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रा.आ. केंद्रे, ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालये सामान्य रुग्णालये, नगरपालिका दवाखाने, महानगरपालिका दवाखाने, शासकीय / निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविदयालये, आश्रमशाळा, अंगणवाडी येथे कुष्ठरोग निर्मुलनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos