नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई मेट्रोची ॲक्वालाईन सेवा रात्रभर उपलब्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री रात्रभर मेट्रो सेवा सुरू, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन MMRC ने घेतला महत्त्वाचा निर्णय मुंबईतील नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या प्रवासाची सोय लक्षात घेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री, मेट्रोच्या ॲक्वालाईन (मेट्रो-३) सेवा रात्रभर सुरू राहील, ज्यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी किंवा रिक्षाची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता भासणार नाही.
ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रात्री १० : ३० वाजल्यापासून सुरू होईल आणि १ जानेवारी २०२६ च्या पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने चालू राहील. यानंतर, १ जानेवारीपासून मेट्रोची नियमित सेवा सकाळी ५:५५ वाजेपासून सुरू होईल. या निर्णयामुळे मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत मिळणार आहे.
नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे, आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रोची ही रात्रभराची सेवा अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.
मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.
News - Rajy




Petrol Price




