महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम


- निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांचे निर्णय आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे अंतिम असतील. याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे निवडणुका वेळेत आणि कालबद्धपणे होणे शक्य होणार आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंत्रिमंडळाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार, उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा नाकारणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची तरतूद वगळण्यात आली आहे.

पूर्वी, जिल्हा न्यायालयात उमेदवारी अर्जावर निर्णय घेत असले तरी अनेक वेळा अपील प्रलंबित राहून निवडणुका कालावधीत होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावानुसार, उमेदवारी अर्जासंबंधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम ठरणार आहे.

या सुधारणांसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos