घाटंजी तालुक्यातील कोची शाळेतील शिक्षक निलंबित


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील कोची जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक सेवा करून घेतल्याप्रकरणी प्रभारी शिक्षक चंपत लखमा किनाके यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ८ डिसेंबर रोजी ही कारवाई केली.
किनाके हे मूळतः राजुरवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून सध्या कोची येथे तात्पुरत्या नियुक्तीवर होते. कोची येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असतांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून हातपाय व डोके दाबण्यासारखी वैयक्तिक सेवा करून घेतल्याचा गंभीर आरोप आहे. याच बरोबर गैरवर्तनाचेही आरोप पालकांनी यावेळी केले होते.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी संतप्त ग्रामस्थ व पालकांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती घाटंजी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किशोर पगारे हे प्रभारी होते. मात्र, तात्काळ कोणतीही कारवाई न झाल्याने पालकांमध्ये रोष होता.
ग्रामस्थांच्या दबावानंतर शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आणि अखेर ८ डिसेंबर २०२५ रोजी निलंबनाचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार चंपत किनाके यांच्यावर कारवाई करण्यात आली.
News - Rajy




Petrol Price




