आरबीआयने ३१ मार्च पर्यंत वाढवले पीएमसी बँकेवरील निर्बंध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (PMC Bank) आणलेले निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत. केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की, 23 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आलेले निर्देश, ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे, त्यांची वैधता 23 डिसेंबर 2020 या तारखेवरून वाढवून 31 मार्च 2021 करण्यात आली आहे. दरम्यान बँकेसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, याच्या पुनर्रचनेसाठी आणि यामध्ये इक्विटी गुंतवणूक करण्यासाठी अर्थात भागीदारी खरेदी करण्यासाठी आतापर्यंत 4 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) प्राप्त झाले आहेत.
गेल्या महिन्यात, पीएमसी बँकेने इक्विटी भागीदारीच्या माध्यमातून बँकेच्या पुनर्रचनेसाठी संभावित गुंतवणुकदारांकडून EOI मागवले होते. हे EOI जमा करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. ज्यामध्ये 4 गुंतवणुकदारांनी रुची दाखवली होती. दरम्यान अद्याप आरबीआयने या कंपन्यांबाबत खुलासा केला नाही आहे की, कोणत्या कंपन्या PMC मधील भागीदारी घेऊ इच्छित आहेत.
  Print


News - World | Posted : 2020-12-19


Related Photos