नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसच्या आसन क्षमतेत वाढ : १६ कोचसह धावेल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रवाशांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासी आसन क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आठ कोच असलेल्या या गाडीत आता आणखी आठ कोच जोडले जातील, ज्यामुळे गाडीला एकूण १६ कोच असतील. ही सेवा सोमवारी, २४ नोव्हेंबरपासून सुरू होईल.
नागपूर येथून वंदे भारत एक्सप्रेस सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू झाली होती. या गाड्यांमध्ये नागपूर-बिलासपूर, नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-पुणे आणि नागपूर-इंदोर यासारख्या मार्गांवर सेवा सुरू झाली. यातील नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसला विशेषत: भरपूर प्रवासी मिळत असल्याने, या गाडीला अधिक कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही गाडी आठ कोचसह धावत असून, प्रवाशांना अनेक वेळा वेटिंग लिस्टवर राहावे लागते.
रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर या गाडीला आठ अतिरिक्त कोच जोडण्यास मंजुरी मिळाली. यामुळे गाडीला प्रवास करणाऱ्यांना अधिक आरामदायक आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहे. नवीन १६ कोचमध्ये दोन एसी एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेअर कार्स असतील.
या बदलामुळे नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेस अधिक प्रवाशांना आकर्षित करेल आणि प्रवासाची सोय सुधारेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
News - Nagpur




Petrol Price




