महत्वाच्या बातम्या

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे संघर्षमय जीवन मातृशक्तीला आदर्शमय : आमदार डॉ. देवराव होळी


- जामगिरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी  : ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी समर्पित केले, अतिशय हाल अपेष्टा सहन करून अतीशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे संपूर्ण जिवन संघर्षमय राहिले. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज महिलाना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलींना शिक्षण मिळावे याकरिता त्यांनी केलेला संघर्ष हा संपूर्ण समाजातील मातृ शक्तीला अतिशय आदर्शमय असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित जामगीरी, फराडा येथील कार्यक्रमाच्या प्रसंगी केले. जामगीरी येथील कार्यक्रमाच्या प्रसंगी भैय्या वाढई सरपंच जामगिरी, खुशाल वाढई, पांडुरंग वाढ़ई , दिलीप चलाख तालुका अध्यक्ष, शेषराव कोहळे , संगीता भोयर माजी प.स. सदस्य, देवीदास भोयर, चंद्रशेखर साखरे, वातु वसाके अध्यक्ष, उमा शेंडे सचिव, विलास कासेवार, प्रमोद वाढ़ई, धनराज गुरनुले, समाज बांधव, मातृशक्ती मोठया संख्येने उपस्थित होते. तात्कालीन काळातील रूढीवादी परंपरा, अन्यायकारी चालीरीती यांना विरोध करीत स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतिशय संघर्ष केला  त्यांच्या संघर्षमय जीवनातूनच आज स्त्रियांना समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. सावित्रीबाई फुले या एक  थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.  त्यांनी  महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात केलेले महत्वाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी याप्रसंगी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos