पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्या १७ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शुक्रवार १७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता वर्धा बसस्थानक परिसरात उमेदच्यावतीने आयोजित फराळ महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता पोलीस स्टेशन बाजार चौक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह देवळी येथे आयोजित वर्धा जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थिती.
१८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रकृती आयुर्वेद चिकित्सालय नादुरा सेवाग्राम येथे आयोजित धन्वंतरी पूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता मांडगाव येथील वना नागरीक सहकारी बँक शाखेच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित वर्धा युथच्या सदस्यासोबत बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता लोकमहाविद्यालय येथे एसीई अकॅडमी उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.
१९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ ते रात्री ८ वाजता पर्यंत राखीव. रात्री 8 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.
News - Wardha




Petrol Price




