लेहमध्ये विद्यार्थ्यांचा वादग्रस्त आंदोलन : भाजप कार्यालय आणि पोलिस वाहन जळाले


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / लदाख : लेहमध्ये आज विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने पोलिसांच्या वाहनांसह भाजप कार्यालयावर आग लावली. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण केलेले सोनम वांगचूक यांनी हिंसक घटनांमुळे आपले उपोषण थांबवण्याची घोषणा केली.
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचे पूर्ण राज्यत्व संपुष्टात आले आणि लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन झाला. त्यानंतर वांगचूक यांनी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी विविध आंदोलनात्मक उपक्रम राबवले.
आज वांगचूक यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. निदर्शकांनी पोलिसांशी झटापट केली, दगडफेक झाली, आणि सीआरपीएफच्या वाहनालाही आग लागली. भाजप कार्यालयाबाहेरही निदर्शकांनी जोरदार मोर्चा काढला. लडाख बंद दरम्यान लेहमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते, परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
वांगचूक म्हणाले, हा लडाखसाठी दुःखद दिवस आहे. आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चाललो आहोत. उपोषण केले, लेह ते दिल्लीपर्यंत पायी चाललो. आज हिंसाचार, गोळीबार आणि जाळपोळ होताना पाहून उपोषण सोडत आहोत. तरुण पिढीला विनंती करतो की, हे थांबवावे. प्रशासनाने गोळीबार थांबवावा. लडाख आणि देशात अस्थिरता हवी नाही.
वांगचूक यांनी पुढे सांगितले की, ही तरुण पिढी बेरोजगारी आणि वेगवेगळ्या कारणांमुळे रस्त्यावर उतरली आहे. आजचे घटनाक्रम जेन झेडची क्रांती आहे. आमच्या सांगण्यावरून हे झाले नाही. केंद्र सरकारने या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
News - World




Petrol Price




