महत्वाच्या बातम्या

 शिवारात वाघाचे भरदिवस दर्शन : शेतकरी दहशतीत, जेरबंदीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : नांदुरा तालुक्यातील राहाटी, काजळी, नागाझरी, धोतीवाडा, बांगडापूर, जोगा, नांदुरा, चिखली, खैरी व बोरगाव शिवारात भरदिवसा वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामात दिवसरात्र शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीकाम करावे लागत आहे.

हा भाग जंगलालगत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेती येथे आहे. सोयाबीन, तूर, कपाशी व संत्रा बागांत हिरवळ पसरलेली असून या हिरवाईत वाघ दबा धरून बसल्याचे अनेकदा शेतकऱ्यांना दिसले आहे. त्यामुळे कधीही हल्ला होण्याची शक्यता असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

वनविभागाने तातडीने या वाघाला जेरबंद करावे किंवा मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तोपर्यंत गावोगावी वनकर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र गस्त घालावी, अन्यथा वाघाच्या दहशतीमुळे शेती पडीक पडण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रहारचे रोशन वरठी यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.





  Print






News - Wardha




Related Photos