महत्वाच्या बातम्या

 कॅनरा बँकेच्या एफडीवर ७% पर्यंत निश्चित व्याज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : यावर्षी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात १.०० टक्क्यांची कपात केल्यामुळे कर्ज घेणे स्वस्त झाले असले, तरी एफडीवरील व्याजदरांमध्ये घट झालेली दिसून येते. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक आपल्या ठेवीदारांना अजूनही स्पर्धात्मक व आकर्षक व्याजदर देत आहे. विशेष म्हणजे, या बँकेच्या काही एफडी योजनांमध्ये फक्त १ लाख रुपयांवर तब्बल १४ हजार ३२५ रुपयांचे निश्चित व्याज मिळत आहे.

एफडीवर ७.२०% पर्यंत व्याज -
कॅनरा बँकेत ग्राहकांना ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी मुदत ठेवी ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या काळात बँकेकडून ३.२५% ते ७.२०% पर्यंत व्याज दिले जात आहे.

४४४ दिवसांची खास योजना -
सध्या कॅनरा बँकेची ४४४ दिवसांची स्पेशल एफडी योजना लोकप्रिय ठरत आहे. सामान्य नागरिकांना : ६.५०% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना : ७.००% व्याज, सुपर ज्येष्ठ नागरिकांना : ७.१०% व्याज

याशिवाय, २ वर्षांच्या एफडीवर -
सामान्य नागरिकांना : ६.२५% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना : ६.७५% व्याज

१ लाख रुपयांवर किती परतावा -
जर एखादा ज्येष्ठ नागरिक कॅनरा बँकेत २ वर्षांसाठी १ लाख रुपयांची एफडी करतो, तर मुदतपूर्तीवेळी त्याला १ लाख १४ हजार ३२५ रुपये मिळतील. त्याच वेळी सामान्य नागरिकाला त्याच कालावधीसाठी १ लाख १३ हजार २०५ रुपये मिळतील.

ही योजना निश्चित व्याजदर देणारी असून मुदतपूर्तीनंतर परतावा ठरलेलाच असतो. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा फारसा परिणाम होत नाही. ही योजना कमी जोखमीसह स्थिर परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरते.





  Print






News - World




Related Photos