महत्वाच्या बातम्या

 वैनगंगा नदीत तीन युवक बुडाले : दोन मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : मंगळवारी (१२) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास बालाघाट जिल्ह्यातील रामपायली तालुक्यात वैनगंगा नदीत तीन युवक आंघोळीसाठी गेले असताना बुडले. अंधारामुळे तात्काळ शोध मोहीम राबवता आल्यात नाही. त्यामुळे बुधवारी (१३) सकाळपासून पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात आली.

बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित महेश बुर्डे वय २० व अखिल चमनलाल बुर्डे वय २१ हे दोघे बेनी गावचे तरुण असून तिसरा युवक राकेश नंदनवार रा. तुमसर, भंडारा आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास अखिलचे वडील चमनलाल बुर्डे यांच्यासोबत हे तिघेही वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. अचानक ते खोल पाण्यात बुडू लागले. अखिलचे वडील चमनलाल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही आणि ते तिघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

घटनेची माहिती गावात पसरताच मोठा जमाव नदीकाठी जमा झाला आणि तरुणांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बालाघाट जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती देऊन शोधमोहीम सुरू करण्यास सांगितले. मंगळवारी सायंकाळी उशीर झाल्यामुळे शोधमोहीम सुरु होऊ शकली नाही. बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या शोधात मोहित महेश बुर्डे आणि अखिल चमनलाल बुर्डे यांच्या मृतदेह सापडले, तर राकेश नंदनवारचा अद्यापही शोध सुरू आहे.

भंडारा जिल्ह्यातील राकेश नंदनवार रक्षाबंधननंतर बालाघाटमधील भुजली उत्सवात सहभागी होण्यासाठी पाहुणे म्हणून आला होता. तोही अखिलच्या वडिलांसोबत आंघोळीला गेलेला होता आणि या दुर्दैवी अपघाताचा बळी ठरला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos