गडचिरोलीत मिनीडोरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दुचाकीने जात असलेल्या विद्यार्थिनीस  भरधाव  मिनीडोरने धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना आज  १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील बजाज शो रुमजवळ घडली. 
श्रुतिका विलास मंडलवार(१६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक बोंडकू मुखरु राऊत (२९) याला अटक केली आहे. बोंडकू राऊत हा एमएच ३३ - जी ११७४ क्रमांकाचे टाटाएस वाहन घेऊन गडचिरोली शहरातून कॉम्प्लेक्सच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरुन श्रुतिका मंडलवार ही स्कुटीने गडचिरोली शहराकडे शिकवणी वर्गासाठी येत होती. बजाज शोरुमजवळ  वाहनाने श्रुतिकाच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.  पोलिसांनी   वाहनचालक बोंडकू राऊत याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. मृत श्रुतिकाचे वडील जिल्हा सामान्य रुग्णालयात कक्षसेवक पदावर कार्यरत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-12


Related Photos