chat.whatsapp.com/8tkIvzK0XcVEjsHKgUfP9o

" /> chat.whatsapp.com/8tkIvzK0XcVEjsHKgUfP9o

"/>
महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय पिक स्पर्धांचे निकाल जाहीर


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा  : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पिक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सन - २०२१ च्या खरीप हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तुर व सोयाबीन या पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या पिकांसाठी जिल्ह्यात एकूण २३५ स्पर्धक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल जिल्हास्तरीय पिकस्पर्धा समितीमार्फत घोषित करण्यात आला आहे.
सोयाबीन सर्वसाधारण गट प्रथम क्र. सुधाकर शंकरराव खाडे रा. दहेगाव ता. सेलू, दुसरा क्र. बाबाराव पोहाणे रा. सिरसगाव ता. हिंगणघाट तिसरा क्र. विजय चिंधुजी पोहाणे रा. सिरसगाव ता. हिंगणघाट यांनी पटकाविला आहे.
सोयाबीन आदिवासी गटात प्रथम क्र. विद्याधर मारोतराव कन्नाके रा. दिंदोडा ता. सेलू दुसरा क्र. मधूकर शामराव मसराम रा. जुवाडी ता. सेलु यांनी पुरस्कार पटकाविला. पिकस्पर्धा विजेता शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत प्रथम क्रमांकाला रक्कम रु. १० हजार द्वितीय क्र. रु. ७ हजार आणि तृतीय रु. ५ हजार बक्षीस रक्कम मिळणार आहे. सर्व विजेत्या शेतकऱ्यांचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.  

--------------------------------------------------
विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या व्हाट्सप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
chat.whatsapp.com/8tkIvzK0XcVEjsHKgUfP9o





  Print






News - Wardha




Related Photos