मुक्तिपथ तर्फे पोलीस अधिक्षक गोयल यांचे स्वागत


- बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा मुक्तीपथ अभियानातर्फे स्वागत करण्यात आला. तसेच संचालक डॉ. मयूर गुप्ता व पोलीस अधीक्षक गोयल यांच्यात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. डॉ. गुप्ता यांनी मुक्तिपथ कार्यक्रमासंदर्भातील माहिती गोयल यांना दिली.
मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी गडचिरोलीचे  नवे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी एसपी गोयल व डॉ. गुप्ता यांच्यात झालेल्या बैठकीत मुक्तिपथ अभियानाची रूपरेषा डॉ. गुप्ता यांनी  सांगितली. मुक्तिपथ अभियान महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असून मुख्यमंत्री कार्यगटाचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यात पोलीस विभाग व मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीचा व्यवसाय व तंबाखूविक्री यावर आळा घालण्यासाठी लोक संघटनांच्या माध्यमातून मुक्तिपथ करत असलेले प्रयत्न व आगामी काळात करावयाच्या कामाचे नियोजन डॉ. गुप्ता यांनी पोलीस अधीक्षक गोयल यांना सांगितले. यावेळी गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यात दारू व तंबाखूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यात पोलीस विभाग व मुक्तिपथ अभियानाचे समन्वय अधिक मजबूत केल्या जाईल. तसेच लवकरच जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करून उध्दभवणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली जाईल, असेही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी म्हंटले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-10-17


Related Photos