महत्वाच्या बातम्या

 जखमी चितळाला मिळाले जीवदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : शहरातील मोकाशी ले आउटमधील काळे यांच्या घराजवळ जखमी अवस्थेत चितळ आढळून आले. स्थानिकांनी वनविभाग आणि माजी नगरसेवक छोटूभाई यांना माहिती दिली. नालीजवळ जखमी अवस्थेत आढळलेले चितळ छोटूभाई शेख, अरूण उमरे, मनिष जेठाणी, धनराज आसेकर, पवन रामटेके आदींनी 24 तास सेवा ग्रुप चे अध्यक्ष लखन केशवानी उचण्यासाठी सहकार्य करून वनविभागाचे राऊंड ऑफिसर खोब्रागडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर वनविभागानी  उपचाराकरिता  सदर चितळाला दवाखान्यात दाखल केले. त्याला कुत्र्यांनी जखमी केले असावे असा अंदाज आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos