औद्योगिक प्रदूषणावर संशोधन : शक्ती प्रकाश केराम यांना गोंडवाना विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींच्या केस व नखांच्या नमुन्यांमधील सूक्ष्म मूलद्रव्ये आणि जड धातूंचे जैविक परीक्षण या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सादर करून संशोधक शक्ती केराम यांना गोंडवाना विद्यापीठ तर्फे विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. औद्योगिक प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणारे हे संशोधन शैक्षणिक क्षेत्रात विशेष लक्षवेधी ठरत आहे.
या संशोधन कार्यासाठी डॉ. जी. डी. देशमुख यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. हेमंत सपकाळ यांचेही संशोधन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. अंत्यत्त हलाखीच्या परिस्थिती मध्ये शिक्षण घेत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत शिक्षणाची ज्योत पेटवत, शिक्षनात खंड नं पडू देता संशोधन पूर्ण केले. आपल्या संशोधन कार्याचे यश मार्गदर्शक डॉ. प्राचार्य देशमुख सर,आई, पत्नी, बहीण, भाऊ तसेच कुटुंबीयांच्या पाठबळामुळे शक्य झाल्याची भावना शक्ती केराम यांनी व्यक्त केली.
शक्ती केराम यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल माजी अतिष्ठाता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे प्रा. डॉ. अमीर धमानी,प्रा अतुल कामडी,गोंडवाना विदयापीठाचे सिनेट सदस्य स्वरूप तारगे, सिनेट सदस्य प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, सिनेट सदस्य सौ. किरन गजपुरे,गोंडवाना विद्यापीठ चे माजी सिनेट सदस्य अजयजी काबरा यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. औद्योगिक प्रदूषण आणि मानवी आरोग्य यातील संबंध स्पष्ट करणारे हे संशोधन भविष्यात पर्यावरणीय व आरोग्यविषयक अभ्यासासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.




Petrol Price




