महत्वाच्या बातम्या

 शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे आवश्यक जिल्हाधिकाऱ्यांकडून परिपत्रक जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना पसरण्याची भिती असल्याने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनांच्या ठिकाणी सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी येणाऱ्या अभ्यागतांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे. काही देशांमध्ये झपाट्याने कोरोनाचा संसर्ग होत आहे. भारतातही संसर्ग पसरण्याची भिती आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे प्रभावी साधन आहे. त्यामुळे मास्क वापरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना निर्गमित केल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनांमध्ये मास्क वापरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह येथे येणाऱ्या अभ्यागतांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos