१ सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. १ सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने या शाळा सुरु होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका बैठकीत या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचे संकेत दिले. अनलॉक -३ ची मुदत ३१ ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नव्या गाईड लाईन्समध्ये यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
अनलॉकच्या प्रक्रियेनुसार सर्व व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सरकारने योजना आणखी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होऊ शकतात. त्यात १०  ते १२ वीच्या वर्गांना परवानगी दिली जाऊ शकते. नंतर क्रमाने विद्यार्थ्यांना बोलावले  जाऊ शकते. त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याची नियमावली शाळांना दिली जाणार आहे.
मात्र प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना सुरु करण्याची परवानगी दिली जाणार नाही असे संकेतही केंद्राने दिली आहेत. मात्र देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या ९ दिवसांत जवळपास ५० हजारहून अधिक रोज नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद केली जात आहे. आज मात्र गेल्या अनेक दिवसांमधील सर्वात धक्कादायक आणि रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे.
देशभरात २४ तासात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाग्रतांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंतचा आकडा २० लाख २७ हजार ०७४ वर पोहोचला आहे. बुधवारी ५६ हजार २८२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनामुळे २४ तासांत ९०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  दिली आहे.
  Print


News - World | Posted : 2020-08-07


Related Photos