ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा  सोपविण्यात आली आहे.
ना.शिंदे यांच्याकडे गडचिरोली व ठाणे जिल्हयाचे पालकत्व सोपविण्यात आले आहे. मात्र राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता काही काळासाठी गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ना.वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आलेला पालकमंत्री पदाचा अतिरिक्त भार काढून आता पुन्हा गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे शासन परिपत्रक आज २३ जुलै रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-23


Related Photos