स्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
   येथील स्टेला मेरिस कॉन्व्हेंट च्या आवारात दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसने त्याच शाळेत कार्यरत सुरक्षा रक्षकाला  धडक दिल्याने त्याचा मृत्यू  झाल्याची खळबळजनक घटना आज ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता घडली. विशेष बाब म्हणजे स्कूल बस चालक व सुरक्षा रक्षकाचे साडभाऊ असल्याचे   बोलले जात आहे. 
मृतक सुरक्षा रक्षकाचे नांव पुंडलिक रामटेके (४०)  व बस चालकाचे नांव मनोहर नगराळे (४५) असे आहे. दोघेही रा. बामणवाडा येथील रहिवासी आहेत. 
प्राप्त माहितीनुसार  आज दुपारी नेहमी प्रमाणे कॉन्व्हेंट ला सुट्टी झाल्यानंतर शाळकरी विद्यार्थी स्कुल बस क्रमांक एम एच ३४ ए  ८२२२ बसमध्ये बस. बस समोर कर्तव्यावर  असलेला सुरक्षा रक्षक पुंडलिक स्वतःच्या मुलीशी काही बोलत होता.  तितक्यात काही समजायच्या आतच स्कुलबस त्याच्या अंगावरून गेल्याने त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असतांना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
कर्तव्यावर असलेल्या मृतकाला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ब्लॅक पँथर फ्रेंड्स ग्रुप चे विजय चन्ने, पवन चिंतल, विनोद बानकर, सतीश बानकर, दीपक खनके, मंगेश भुते, निखिल बजाईत, भुवन सल्लम ने केली आहे. समोरील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-03


Related Photos