महत्वाच्या बातम्या

 विशेष लोक अदालत २१ नोव्हेंबर रोजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सलमान एम. आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रविण उन्हाळे यांनी केले आहे.

लोक अदालतीचा मुख्य उद्देश न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे त्वरीत निकाली काढून पक्षकारांना त्वरीत न्याय देणे हा आहे. जिल्ह्यात न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांची व दाखलपूर्व प्रकरणांमधील तडजोड योग्य प्रकरणांची छाननी करुन आपसी समझोत्याकरीता प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येत असतात.

विशेष लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणासाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos