महत्वाच्या बातम्या

 लॉयड्स मेटल्समधून दोन टन स्टीलची चोरी : भंगार व्यवसायिक आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : लॉयड्स मेटल्स कंपनीच्या आवारातून तब्बल दोन टन स्टीलचे साहित्य चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा घुग्घुस पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात ६७ वर्षीय भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, चोरीचे स्टील साहित्य आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रमोद केशवराव कवाडे ६७ वर्ष, रा. विठ्ठल बाबा मंदिर नगर, घुग्घुस याला पोलिसांनी अटक केली. तो भंगार व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.

फिर्यादी मनोज शंकरराव महाजन ३९ वर्ष, रा. बापटनगर, चंद्रपूर हे लॉयड्स मेटल्स कंपनीत कोक ओव्हन साईडचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या आवारात रस्त्याच्या कामासाठी उघड्यावर ठेवण्यात आलेले जॉइंट बॉल ऑफ स्पेस फ्रेम हे स्टीलचे साहित्य १० ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. सुमारे दोन टन वजनाच्या या साहित्याची किंमत १ लाख २० हजार रुपये होती. याप्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी फिर्याद दाखल झाल्यानंतर घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे स्टील साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टीव्हीएस वेगो मोपेड जप्त केली. स्टील साहित्याची किंमत १ लाख २० हजार रुपये, तर मोपेडची किंमत ६० हजार रुपये असून, एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संजय अतकुलवार, अनिल बैठा, विशाल हूड, पोलीस अंमलदार महेश भोयर, रवींद्र शेंडे, पवन डाखरे आणि तोताराम ठाकरे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos