मुंबईवरून गडचिरोलीत आलेल्या आणखी एकाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह : कोरोना रुग्णांचा आकडा पोहचला ४१ वर


- एकाच कुटुंबातील दोनजण आढळले कोरोना बाधित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुंबई येथून गडचिरोली शहरात आलेल्या आणखी एकाचा अहवाल आज, ६ जूून रोजी दुपारी ४ वाजता कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ४१ वर पोहचला आहे. काल कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या कुटुंबातीलच हा दुसरा कोरोना रुग्ण आहे. त्यामुळे आता गडचिरोली शहरातील एकाच कुटुंबातील २ सदस्य कोरोना बाधित आहेत. सदर रूग्ण हा गडचिरोली शहरातील असून त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सद्या जिल्हयात १५ सक्रीय कोरोना बाधित रुग्ण आहेत. गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या कामगार, विद्यार्थी व नागरिक आल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील ४१ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. मात्र कोरोना बाधित रुग्णांपैकी बरेच रुग्ण उपचारानंतर बरे होउन घरी जात असल्याने गडचिरोलीवासियांना दिलासा मिळत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-06


Related Photos