आधी विष प्राशन केले, नंतर सासूचे घर पेटवले

- अंगावर काटा आणणारा प्रकार : सैनिकाच्या संतापाचा भडका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : कौटुंबिक वादातून आधी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडताच थेट सासूचे घर जाळून खाक करण्याचा प्रयत्न करणे, असा संतापजनक प्रकार चनकापूर येथील जयभोले नगर (वॉर्ड क्र. १) परिसरात समोर आला आहे. भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या एका जवानाच्या या कृत्यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.किसन साबू उईके ३२ वर्षे रा. चनकापूर, जयभोले नगर, वॉर्ड क्र. २ असे पत्नी मुलांसह बहिणीच्या घरी गेली आश्रयाला
घटनेची माहिती मिळताच पत्नीने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. पतीच्या वाढत्या दहशतीमुळे जीव वाचवण्यासाठी पत्नी आपल्या मुलांसह वॉर्ड क्र. ३ येथील बहिणीच्या घरी आश्रयाला गेली आहे. या सैनिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी आरोपी किशन हा सासुरवाडीत आला होता. तिथे पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाच्या भरात त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती खालावल्याने त्याला प्रथम चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गंभीर अवस्थेत नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला २ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. पतीच्या आक्रमक स्वभावामुळे धास्तावलेल्या पत्नीने २ ऑक्टोबर रोजीच स्थानिक खापरखेडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. मात्र, यानंतरही रुग्णालयातून परतलेल्या किशनने ३ ऑक्टोबरच्या पहाटे सासूच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. आगीत संसारोपयोगी साहित्य खाक झाले.




Petrol Price




