पोलिस जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : मुलचेरा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस जवानाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना काल ११ डिसेंबर रोजी रविवारी पाच वाजताच्या सुमारास घडली.
रमेश सत्यनारायण बहिरेवार (43) असे मृत पोलिस जवानाचे नाव आहे.
०९ डिसेंबर रोजी पोलिस जवान रमेशला मुलचेरा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्याला लागलीच हेलिकॉप्टरने नागपुर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. परंतु दोन दिवस नागपुर येथील रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्याचे दुर्दैवी निधन झाले. ते चामोर्शी तालुक्यातील ठाकरी तेथील मूळ रहिवासी होते. ते अतिशय मनमिळावू व मृदू स्वभावाचे म्हणुन परिचीत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच ठाकरी गावात शोककळा पसरली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व आई वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
News - Gadchiroli