अल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोमनपल्ली येथील दोन युवकांना अल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांना आष्टी पोलिसांनी  अटक केली आहे. या युवकांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर तेजराज अवथरे (१९)  व प्रफुल वाल्मीक गोडबोले (२३)  अशी आरोपींची नावे आहेत. 
सोमनपल्ली गावातील काही विद्यार्थिनी रोज शाळेत जात असतात.  परत येत असताना आरोपी समीर तेजराज अवथरे (१९)  व प्रफुल वाल्मीक गोडबोले (२३)  हे मागील काही महिन्यापासून तिन अल्पवयीन शाळकरी मुलींना शाळेत जाताना व परत येताना पाठलाग करुण रस्त्यात जंगल परिसरात सुनसान ठिकाणी अडवून त्याना अश्लील भाषेत,त्याना लज्जा निर्माण होईल अशा भाषेत त्याना त्रास देत होते.  सदर प्रकार काही महिन्यापासून चालु होता.    काल २७ सप्टेंबर रोजी  हा प्रकार सोमनपल्ली गावाजवळील धर्मपुर गावातील नागरिकांच्या निर्दर्शनास आला व त्यावेळी आरोपींनी पळ काढला.   त्या नागरिकांनी आरोपींची माहिती काढून घडलेला प्रकार पिडितांच्या आई वडिलांना सांगितला.  सायंकाळी पीड़ित मुलींनी आपल्या पालकासोबत  आष्टी पोलिस ठाणे गाठून  तक्रार दिली .  पोलिसांनी तपास करून  रात्री  उशिरापर्यन्त एकाला धर्मपुरच्या जंगलातून तर दुसऱ्याला त्याच्या राहत्या घरात सज्यावर लपून असलेल्या ठिकानाहुन अटक केली. आरोपीवर ३५४ ड २, ३४ भादंवि कलम १२ बाललैंगिक अत्याचार प्रतीबंधक अधिनियम २०१२  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .  आज २८ सेप्टेंबर रोजी आरोपींना  न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना जामीन  मंजूर केला आहे. सदर  गुह्याचा तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक समु चौधरी, ए एस आय संघरक्षित फुलझेले, भसारकर आदी करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-28


Related Photos