राजगड फाट्याजवळील शेतात आदळला एक मोठा मगर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
तालुक्यातील राजगड फाट्याजवळील शेतात आज, २१ एप्रिल २०२० ला दुपारी साडेतीन वाजता एक मोठा मगर असल्याची माहिती चंदू पाटील मारकवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांना कळविली. लगेच धाडे यांनी मूल येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे व तन्मयसिंह झिरे यांना माहिती देऊन आपले वनकर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. धाडे यांच्या मार्गदर्शनात उमेशसिंह झिरे, तन्मयसिंह झिरे व वनकर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने त्या मगराला पकडले.. मगर शेतात एका छोट्या झाडाखाली होता. ऊन खुप असल्यामुळे मगराच्या शरीराचे तापमान वाढणे हे मगरासाठी धोकादायक होते. वांरवार थंड पाणी मगराच्या शरिरावर टाकुन त्याचे तापमान स्थीर ठेवण्यात आले. हा मगर राजगड जवळील रस्त्याच्या बाजुला असलेल्या तलावातून आल्याची शक्यता आहे. गावकऱ्यांच्या गर्दीला मगरापासून दूर ठेवण्यासाठी चंदू पाटील मारकवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी क्षेत्र सहाय्यक विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक विकास भोयर, वनरक्षक गायकवाड, वनरक्षक वासेकर, पंकज दुधे, चेतन बोकडे, किशोर कातपल्लीवार यांचे सुध्दा विशेष सहकार्य लाभले.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-04-21


Related Photos