धनत्रयोदशीला रोकडे ज्वेलर्सच्या गडचिरोली शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी!


- ये है नया रोकडे अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; G.O.A.T. ऑफरमध्ये दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुल रोड येथील रोकडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोने, चांदी आणि डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह वाढला असून, ये है नया रोकडे या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १९०२ पासून ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या रोकडे ज्वेलर्सने यंदा आकर्षक G.O.A.T. ऑफर सादर केली आहे. यामध्ये २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ४० टक्के, १८ कॅरेटवर ६० टक्के, तर डायमंड ज्वेलरीच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
तसेच जुन्या सोन्याच्या मूल्यावर १०१ टक्क्यांपर्यंत लाभ आणि सोन्याच्या दागिन्यांवर ५ टक्क्यांपासून मेकिंग चार्जेसचे पर्याय उपलब्ध आहेत. ही ऑफर ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. (नियम व अटी लागू.) शोरूममध्ये पारंपरिक व आधुनिक डिझाइन्समधील १८ व २२ कॅरेट सोन्याचे, डायमंड आणि फॅन्सी डायमंड ज्वेलरीचे आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. खरेदीसोबत सोने-चांदी जिंकण्याची संधीही ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.
यावेळी रोकडे ज्वेलर्सचे संचालक पारस रोकडे यांनी ग्राहकांचे आभार मानत, १९०२ पासून विदर्भवासीयांनी दिलेला विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी संपत्ती आहे. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार दर्जेदार दागिने उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे सांगितले. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भातील विविध शहरांमध्ये रोकडे ज्वेलर्स ग्राहकांच्या सेवेत आहे.




Petrol Price




