राज्यात पुन्हा ११७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर : एकूण रुग्णसंख्या २८०० पार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये पुन्हा ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरातील करोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. अशात आता आज ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ इतकी झाली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-15


Related Photos