पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार


- लॉकडाऊनबाबत मोठ्या निर्णय घेण्याची  शक्यता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १४ एप्रिल ला  देशातील नागरिकांना संबोधित करणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या  पार्श्वभूमीवर पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजारच्या पार गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. काही राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवली आहे. जानेवारी महिन्याच्या ३१ तारखेला केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर हळूहळू देशभरात कोरोना झपट्याने वाढत चालला आहे.
उद्या सकाळी १० वाजता नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. १५ एप्रिल रोजी या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. मात्र असे असले तरी पंजाब, महाराष्ट्र, ओडिसा या राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून ३० एप्रिलपर्यंत केली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. देशभरात लॉकडाऊन असला तरी काही राज्यांमध्ये जेथे कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा ठिकाणी काही अंशी लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

 
  Print


News - World | Posted : 2020-04-13


Related Photos