महत्वाच्या बातम्या

 भाजपला रामराम करीत सुभाष तुराणकर यांची शेतकरी संघटनेत घरवापसी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले सुभाष तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी पुन्हा शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. भाजपला रामराम करीत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेत घरवापसी केली.

कोरपना येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मुसळे, रमा पाटील मालेकर, अनंताभाऊ गोडे, अविनाश मुसळे, नादिर कादरी, शारीक अली, संदीप टोंगे, गणेश तुराणकर, गणपत गोडे, प्रवीण रासपल्ले, सौरभ राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने सुभाष तुराणकर आणि ईश्वर तुराणकर यांनी शेतकरी संघटनेत पुन्हा प्रवेश केला. त्यांच्या या घरवापसीमुळे कोरपना परिसरात शेतकरी संघटनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात संघटनेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रवेशामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





  Print






Related Photos