पालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये


- सर्वांसोबत साधतात संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम हे सध्या गणेशोत्सवानिमित्त अहेरी येथे गणेशभक्त आणि बालगोपालांमध्ये रमलेले दिसून येत आहेत. गणेश दर्शनासाठी येत असलेल्या प्रत्येकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्याशी हस्तांदोलन करून संवाद साधत आहेत. 
अहेरी येथील राजमहालात  दरवर्षीच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यादरम्यान अहेरी उपविभागातील भाविकांची अहेरीत रिघ लागलेली असते. या कालावधीत पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम हे दहा दिवस स्वतः गणेशाची आरती , पुजा करतात. भाविकांना महाप्रसाद वितरीत करतात. संपूर्ण परिवार आरतीसाठी उपस्थित असतो. यावेळी नागरिकांची सुध्दा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 
यावर्षी अहेरीचा राजा गणेश उत्सवात बाहुबली चित्रपटातील महिश्मती महल हा देखावा साकारण्यात आला आहे. यामुळे भाविकांची अलोट गर्दी होत आहे. बालगोपाल, आबालवृध्द सर्वच महिश्मती महल पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. या गर्दीतही ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम हे बालकांसोबत, नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्यात रममान होतांना दिसून येत आहेत. बालकांना चाॅकलेट, बिस्कीट देवून त्यांच्याशी संवाद साधणे, शैक्षणिक स्थितीबाबत विचारणा करणे, कुठून आले , काय करतात अशाप्रकारची चौकशी करीत आहेत. अनेकजण ना. आत्राम यांच्यासोबत छायाचित्र, सेल्फी काढून घेत आहेत. यामुळे नागरिक चांगलेच रममान होत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-20


Related Photos