नियमांचे उल्लंघन करून यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा :
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातार्‍यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १३ मार्च रोजी एका यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पाच हजारहून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातार्‍याच्या वाई तालुक्यात बावधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पाचही आरोपी या यात्रेच्या समितीचे सदस्य होते. पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा सभा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी होती. तरी त्यांनी यात्रेचे आयोजन केले आणि राज्याच्या अनेक भागातून पाच हजारहून अधिक लोक आले होते. त्यामुळे अध्यक्ष राजेंद्र भोसले. उपाध्यक्ष दीपक ननावरे, अंकुश कुंबार, अप्पासो भोसले, संभाजी दाभाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम १८८ आणि आणि कलम १५३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-03-16


Related Photos